राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकरची छातीत कळा येत असल्याची तक्रार, जामीन अर्ज फेटाळला
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा अल्प मुदतीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. कारागृहात आपल्या छातीमध्ये कळा येत असून उपचारासाठी अल्पमुदतीचा जामीन मंजूर करावा, अशी मागणी सत्र न्यायालयापुढे केली होती. सरकारी पक्षाकडून आंबेरकर याचे ईसीजी व टुडीको अहवाल नॉर्मल असल्याचे सांगत न्यायालयापुढे जामीन अर्जाला कडाडून विरोध केला. दरम्यान न्यायालयाने आंबेरकर याला उपचार घ्यावयाचे असल्यास ते पोलिसांच्या निगराणीखाली घेण्याचा सल्ला देत जामीन अर्ज फेटाळून लावला. www.konkantoday.com