रत्नागिरी जिल्ह्यात आरटीईच्या प्रवेशास कमी प्रतिसाद
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेद्वारे जिल्ह्यात इ. १ लीसाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी नोंदणीला सुरूवातीच्या टप्प्यातच निरूत्साहाची किनार लाभलीय. यावर्षी जिल्ह्यात एकूण १२ हजार ३४५ जागांवर मोफत प्रवेश दिला जाणार आहे. पण दिलेल्या ३० एप्रिलच्या मुदतीत केवळ ६३१ जणांनी प्रवेश नोंदणी केलेल्या अर्जांपैकी फक्त १३८ जणांचेच अर्ज वैध ठरले. मंडणगड, राजापूर या तालुक्यातून एकही नोंदी नव्हती. त्यामुळे आता या प्रवेश अर्ज प्रक्रियेसाठी १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. www.konkantoday.com