मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावर अपघात
मुंबई-गोवा महामार्गावरील खेडमधील भरणे जगबुडी पुलावर गुरूवारी पुन्हा एकदा अपघात झाला. मुंबईहून रत्नागिरीला जाणारी रिक्षा पुलानजिकच्या वळणाचा अंदाज न आल्यामुळे उलटली. त्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. भरणे जगबुडी पुलाचे काम हे विचित्र पद्धतीने झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील हा अपघातांचा नवीन ब्लॅक स्पॉट झाला आहे. www.konkantoday.com