नवोदितांना अभिनयाची संधी देणाऱ्या ‘अक्षता आर्ट’ची अल्पवधीत गरुडझेप!

ठाणे : ‘अक्षता आर्ट’तर्फे नवोदित रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने सुप्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक आणि लेखक विलास शांताराम गुरव तसेच निर्माती अक्षता विलास गुरव यांनी निर्माण केलेल्या ‘जयहिंद’ या पहिल्याच लघुचित्रपटाला एक महिन्यातच ५ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यात प्रिप्रेस, भुसावळ या संस्थेने त्यांना सन्मानचिन्ह दिले. जळगावच्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये हा लघुपट सर्वोत्कृष्ट म्हणून निवडला गेला. प्रसिद्ध कलाकार योगेश सोमण आणि आकाश लामा यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण झाले. देवगिरी शॉर्ट फिल्ममध्येच त्यांच्यातर्फे सादर झालेल्या ‘आई बाबा’ या लघुपटाला सन्मानचिन्हही मिळाले. या लघुपटात दोन भावांची हृदयस्पर्शी कथा आहे. ही कथा या महोत्सवात गौरविण्यात आली.त्याचप्रमाणे आर्यारवी एंटरटेनमेंट आयोजित पहिल्याच राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात संस्थेच्या ‘मैं चोर नहीं हूँ’ या लघुपटाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. निर्मिती प्रमुख अक्षता विलास गुरव होत्या. मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये अनीलकुमार शिंप्पी यांच्या हस्ते ‘आई बाबा’ या लघुपटाला ‘सर्वोत्कृष्ट लेखन’ पुरस्कार मिळाला असून सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारही लाभला आहे. या पाच पुरस्कारांशिवाय ‘बाबा मुझे माफ कर दो’ या कथेला ‘बेस्ट कन्सेप्ट’ पुरस्कार देण्यात आला आहे.नुकत्याच झालेल्या बुलडाणा नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये भास्कर वाडेकर यांच्या हस्ते निर्माती सौ अक्षता विलास गुरव यांच्या ३ लघुपटांना पारितोषिके मिळाली आहेत. त्यात ‘मला आई होयचं आहे’ या लघुपटाला उत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक मिळाले तर, ‘बाबा मुझे माफ कर दो’ला ‘बेस्ट कन्सेप्ट’ पारितोषिक मिळाले. तसेच, ‘माझा मारत्या कुठे आहे’ने उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट लेखक ही पारितोषिके पटकावली.त्यानंतर, नुकताच झालेला ‘आर्यरावी एंटरटेनमेंट प्रोडक्शन’चा दुसरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव गाजला. त्यात संस्थेच्या ‘मला आई होय व्हायचं आहे’ आणि ‘बाबा मुझे माफ कर दो’ या लघुपटांनी प्रबोधनात्मक लघुपट म्हणून पारितोषिके पटकावत बाजी मारली याशिवाय झी-नाइन टीव्ही फेस्टिवलमध्ये अरुण गराड यांनी संस्थेच्या ‘बाबा मुझे माफ कर दो’ या लघुपटाला प्रथम क्रमांक देऊन गौरविले. संस्थेच्या ‘आई बाबा’ या लघुपटाला द्वितीय क्रमांक घोषित झाला.निर्मिती प्रमुख अक्षता विलास गुरव आणि लेखक-दिग्दर्शक विलास शांताराम गुरव यांना लवकरच ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांत निर्मातीअक्षता विलास गुरव यांनी सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व नवोदित कलाकार घेऊन या वैविध्यपूर्ण लघुपटांची निर्मिती केली आहे. या कलाकारांना त्यांनी विनामूल्य संधी देत समाजापुढे त्यांनी एक वेगळा आदर्श ठेवला आहे.यू ट्यूब वर ‘अक्षता आर्ट’ या वाहिनीवर हे सगळे लघुपट उपलब्ध करून देण्यात आले आहेत……

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button