
मी १३० वर्षांपर्यंत जगेन,दलाई लामा यांचा ९०वा वाढदिवस साजरा
”मी १३० वर्षांपर्यंत जगेन,” अशी आशा करतो. आम्हाला आमचा देश सोडावा लागला असून भारताच्या आश्रयाला आहोत. पण धर्मशाळा येथे राहून मी सर्व लोकांची आणि धर्माची यथायोग्य सेवा करीत राहीन, असा विश्वास दलाई लामा यांनी त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केला.तिबेटचे १४ वे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई यांचा ९० वा वाढदिवस रविवारी हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. येथील बौद्ध मठात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात हजारो अनुयायी आणि चाहत्यांनी लामांना दीर्घायू आणि आरोग्यदायी जीवनासासाठी सुयश चिंतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना ‘एक्स’ वरून शुभेच्छा दिल्या.




