तुमच्याही पायांच्या नसा निळ्या- हिरव्या किंवा फुगीर दिसतात का?
तुमच्या पायातील रक्तवाहिन्या 🩸 या अगदी बारीक तंतूप्रमाणे आणि अगदी वाकड्या तिकड्या दिसत असतील तर हे लक्षण वेळीच ओळखायला हवे. पायातील नसा सुजल्याने अनेकांना प्रचंड वेदना 😖 जाणवतात, तर काहींना अगदी नेहमीची कामे सुद्धा करणे अशक्य होऊन बसते. वैद्यकीय भाषेत या लक्षणांना *व्हेरिकोज व्हेन्स असे म्हंटले जाते,* यामध्ये नसांच्या आजूबाजूच्या त्वचेचा 🫳🏻रंग बदलणे, बराच वेळ बसून किंवा उभे राहिल्याने तीव्र वेदना होणे असेही त्रास जाणवतात. व्हेरिकोज व्हेन्स वरील उपचारासाठी आपल्याला गोळ्या औषधांचा मारा करण्याची गरज नाही. उलट काही सोप्या आयुर्वेदिक उपचारांनीही आपण आराम 👍🏻 मिळवू शकता. रक्तवाहिन्या शुद्ध राहाव्यात व व्हेरिकोज मुळे होणारी जळजळ किंवा वेदना कमी होण्यासाठी खालील उपाय आपणही करून पाहू शकता..▪️जास्त वेळ उभे 🪑 किंवा बसू नका. ब्रेक घ्या. आपल्या पायाच्या बोटांवर उभे राहणे आणि चालणे 🚶🏻♂️ उपयुक्त ठरू शकते.▪️तुम्ही बसलेले असताना पाय वर करा. आपण डोक्याखाली उशी घेण्याऐवजी पायाखाली ठेवू शकता किंवा भिंतीला लागून बेड असल्यास भिंतीच्या आधारे पाय टेकवून ठेवू शकता. यामुळे रक्तवाहिन्यांना रक्ताभिसरणात मदत होईल.▪️अँटी- इन्फ्लेमेंटरी तेलाने पायाला मसाज करावा, यासाठी मध्यम दाब ठेवा व खालून वर अशा दिशेत मालिश करा.▪️योगासन: विशेषत: शीर्षासन, मेरुदांडासन, पदौत्तानासन, सर्वांगासन, नौकासन अशी आसने करणे फायदेशीर आहे. यामुळे पायात रक्त साचून राहिले असल्यास ते वाहते होण्यास मदत होते.▪️नियमित व्यायाम करा पण अतिरेक करू नका.अशुद्ध रक्तामुळे त्रास उद्भवत असल्यास केवळ व्यायाम नव्हे तर आहारात 🥗 सुधार करणेही गरजेचे आहे. आपल्याला घरगुती उपायांनी आराम मिळत नसल्यास आयुर्वेदिक उपचार घेण्याचा विचार करू शकता. मात्र त्रास वाढेपर्यंत किंवा रक्तस्त्राव🩸 होईपर्यंत थांबू नका, वेळेवर उपचार न केल्यास यावर शस्त्रक्रियेशिवाय उपाय उरत नाही त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.