
जास्त परताव्याचे अमिष दाखवून २४ लाख ८५ हजार रुपये उकळल्याप्रकरणी आणखी एका संशयित आरोपीला राजस्थान मधून अटक
जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत २४ लाख ८५ हजार रुपये उकळल्या प्रकरणी आणखी एका संशयिताला गजाआड करण्यात खेड पोलिसांना यश आले. ही कारवाई सुरत (गुजरात) येथे करण्यात आली.खेड पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव नारायणलाल शंकरलाल जोशी (४२, सध्या रा. ८४, भावना पार्क, १ गोडदरा, सुरत, गुजरात, मुळ रा. पोस्ट प्लास्मा, गाव गुजरो, गुढा तहसिल शायरा, जि. उदयपूर, राजस्थान) असे आहे. त्याला १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता खेड पोलिसांच्या पथकाने अटक केली. या गुन्ह्यात यापूर्वी एक आरोपी चंदिगड येथून २१ जून रोजी अटक करण्यात आलेला असून त्या संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. १९ एप्रिल ते २४ मे २०२४ या कालावधीत तक्रारदाराला एआरके लर्निंग ग्रुप या व्हॉटसऍप ग्रुपवरील ट्रेडिंग संदर्भातील माहिती तसेच दोन मोबाईल क्रमांकावरून येणार्या व्हॉटसऍप मेसेजद्वारे तक्रारदार यांना एआरके ग्रुपमध्ये पैशाची गुंतवणूक करून जास्तीत जास्त रकमेचा परतावा देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. अनोखळखी व्यक्तीने तक्रारदाराची २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केली. www.konkantoday.com