कोकण रेल्वे मार्गावरील उधना-मंगळूर धावली साडेचार तास विलंबाने
कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्यांसह उन्हाळी स्पेशल हाऊसफुल्ल धावत असल्याने जागा मिळवताना प्रवाशांची चढाओढ सुरू आहे. त्यात विलंबाच्या प्रवासाची भर पडत असल्याने प्रवाशांचा मनस्ताप कायम आहे. ०९०५७ क्रमांकाची उधना-मंगळूर स्पेशल तब्बल ४ तास ३५ मिनिटे विलंबाने मार्गस्थ झाली. या पाठोपाठच ०११३९ क्रमांकाची नागपूर-मडगाव स्पेशलही साडेतीन तास उशिरााने रवाना झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. या २ स्पेशल विलंबाने धावण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. www.konkantoday.com