
पांगरी प्रिमियम लीग क्रिकेट स्पर्धेत सिल्व्हर स्टार पांगरी संघाला विजेतेपद
संगमेश्वर: तालुक्यातील पांगरी येथे पांगरी प्रीमिअर लीग (PPL) या भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांच्या स्पर्धेत गावातील ८ संघांनी व १२७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सिल्व्हर स्टार पांगरी संघाने विजेतेपद मिळविले. पांगरी स्ट्रायकर संघाने उपविजेतेपद मिळविले. बेस्ट फलंदाज संदीप शांताराम बावदाने, बेस्ट गोलंदाज व मन ऑफ द सिरीज अनिकेत किशोर मुळे, बेस्ट फिल्डर अभिषेक शांताराम गावडे यांनी पारितोषिक मिळविली.
पांगरीत होणारी ही पांगरी प्रिमियम लीग स्पर्धा आता गावाच्या अभिमानाचा उत्सव बनली आहे. खेळ, एकता आणि बंधुत्वाचा संदेश देणारी ही लीग गावातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी अध्यक्ष हरेश म्हादे, सेक्रेटरी ओंकार तेगडे, खजिनदार अमित कातकर, अजय दुडये, सल्लागार दिपक तेगडे, सरपंच सुनिल म्हादे, सचिन पानगले, गौरव पानगले, दिपक गावडे, अक्षय म्हादे, संजय बावदाने, शुभम गावडे, संदेश दुडये सुरज कांबळे व सर्व कमिटी सदस्यांनी आणि गावातील ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.




