
१० मे रोजीच्या अडीच तासाच्या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरील तीन रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार
कोकण रेल्वे मार्गावरील निवसर-राजापूर विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी १० मे रोजी अडीच तासांच्या घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे ३ रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडणार आहे. शुक्रवारी सकाळी ९.१० वा. घेण्यात येणारा मेगाब्लॉक सकाळी ११.४० वाजता संपुष्टात येईल. या मेगाब्लॉकमुळे १०१०६ क्रमांकाची सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस १० मे रोजी सावंतवाडी येर्थन ४५ मिनिटे उशिराने म्हणजेच ८.४० ऐवजी ९.२५ वाजता सुटणार आहे.१२०५१ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस १० मे रोजी रत्नागिरी-निवसर विभागादरम्यान ३० मिनिटे रोखण्यात येईल. याचदिवशी २२१९९ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकात २० मिनिटे थांबवण्यात येणार आहे. www.konkantoday.com