
संगमेश्वर तालुक्यातील परचुरी चंदरकरवाडी येथे आजारपणाला कंटाळून तरूणाची आत्महत्या
आजारपणाला कंटाळून संगमेश्वर तालुक्यातील परचुरी चंदरकरवाडी येथील सुरेंद्र अनंत चंदरकर (४३) याने राहत्या घरात लाकडी वाशाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना ७ मे रोजी सायंकाळी ५.३० च्या पूर्वीच घडली. याबाबत पत्नी सारिका सुरेंद्र चंदरकर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार सुरेंद्र चंदरकर हे आजाराने त्रासून गेले होते. उपचार करूनही बरे होत नसल्याने ते कंटाळून गेले होते. घरातील पत्नी मतदानासाठी गेली असता सुरेंद्रने किचन रूममधील लाकडी वाशाला गळफास घेवून आत्महत्या केली. संगमेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पंदेरे अधिक तपास करत आहेत.www.konkantoday.com