राजापूर तालुक्यातील नाटे धाऊलवल्ली येथे कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी
राजापूर तालुक्यातील नाटे धाऊलवल्ली येथे कारच्या धडकेत दुचाकीरील दोघे जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. अरशान तकीर सोलकर (२२, रा. नाटे, ता. राजापूर) व तासिम नवाज उना (२१, रा. साखरीनाटे, ता. राजापूर) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरशान सोलकर हा ८ मे २०२४ रोजी दुचाकी (एमएच ०८ बीएफ ८०७) घेवून नाटे ते रत्नागिरी असा येत होता. यावेळी त्याच्या दुचाकीवर मित्र तासिम हा बसला होता. दुपारी १२.३० च्या सुमारास ते धाऊलवल्ली येथे आले असता समोरून येणार्या कारने (एमएच ०८ एके ८८६५) अरशान याच्या ताब्यातील दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात अरशान व तासिम हे दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर रत्नागिरीतील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.www.konkantoday.com