मराठी भाषा आणि आपण

नुकताच *१ मे अर्थात महाराष्ट्र दिन साजरा झाला. हा दिवस *मराठी भाषा दिन व कामगार दिन याही नावाने ओळखला जातो.. आपल्या सगळ्यांनाच महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि महाराष्ट्र दिनाचा इतिहास ज्ञात आहे; असं मी समजतो. निदान महाराष्ट्रात रहाणाऱ्या माणसांना, खास करून प्रत्येक मराठी माणसांना तरी तो माहिती असायलाच हवा.   आपली मातृभाषा म्हणजे मराठी ! अनेक वर्षांचा इतिहास व परंपरा आपल्या मराठी भाषेला लाभलेली आहे . मराठी भाषा ही यादृच्छिक संकेत व्यवस्था नसून, ती माणूसपणाची ओळख आहे. खरं सांगायचं झालं तर भावनांचे प्रगटीकरण आहे ; पण दुर्दैवाची बाब हीच आहे की *आपली मातृभाषा मराठी असून काहींना ती बोलताच येत नाही ! आम्हाला इतर भाषा चांगल्या प्रकारे बोलता येतात; पण _मराठी_ भाषा आम्हाला तोडकी मोडकी येते, हे सांगणं खरच लज्जास्पद आहे. *जी आपली मातृभाषा आहे तीच आपल्या न येणं , हे खरच नीलार्जे पणाच सामजिक लक्षण आहे.* आम्हाला इंग्रजी महिने माहिती आहेत; पण मराठी महिने ही आहेत, हेच माहिती नाही अशी काही माणसं निदर्शनास येत असतात. आपली मराठी भाषा जेव्हा अभिजात भाषा म्हणून गणली जाते . तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे. हे ही काहींना ज्ञात नसेल. आपल्या मातृभाषे सोबतच आपल्या संस्कृतीचा ही विसर पडू देऊ नका एवढंच सांगणं आहे . कुठलीच भाषा / संस्कृती कमी नाही आहे. सगळ्या भाषा/ संस्कृती ह्या योग्यच आहेत ; परंतु आपण ज्या मातीत जन्मलो ,ज्या आपल्या मातृ भाषेचा आधार घेत *”आई”* हा पहिला शब्द उच्चारायला शिकलो, त्या भाषे प्रति आपण अभिमान बाळगला पाहिजे. ह्या भाषेतील गोडवा ,जिव्हाळा ,प्रेम हे इतर कुठल्याच भाषेत मिळणार नाही . रोजच्या जीवनात परप्रांतीय भाषांचा वापर कमी करून आपल्या मातृभाषेचा वापर केला पाहिजे . प्रत्येकाला नेहमीच वाटत असतं. आपल्याला इंग्रजी , हिंदी, जर्मनी इत्यादी भाषा आल्या पाहिजे. त्या येणं ही गरजेच च आहे. पण आपली मातृभाषा त्याही पेक्षा चांगल्या प्रकारे येणं हे जास्त गरजेचं आहे. मित्र हो कुठल्याच माध्यमांचे शिक्षण हे वाईट नसत ; परंतु वाढत्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण न घेता मराठी शाळांमध्ये शिक्षण घेत ,आपली मराठी भाषा, संस्कृती जोपासत , वाढवत नेण्याचा आपण जर प्रामाणिक प्रयत्न केला तर, येणारा *प्रत्येक महाराष्ट्र दिन हा खऱ्या अर्थाने साजरा होईल…!!* *_- अनुज बिर्जे_* *🚩जय महाराष्ट्र..!!!🚩*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button