वॉचमन खून प्रकरणात संशयित आरोपी वेदांतचे रक्ताने माखलेले कपडे पोलिसांकडून जप्त
रत्नागिरी शहरातील गवळीवाडा येथे वॉचमनच्या खून प्रकरणात संशयित आरोपी वेदांत आखाडे याचे रक्ताने माखलेले कपडे पोलिसांककडून हस्तगत करण्यात आले आहे. वॉचमनचा लाकडी दांडक्याने वार करून खून करताना रक्ताच्या चिळकांड्या वेदांत याच्या कपड्यांवर उडाल्या होत्या. रक्ताचे डाग असलेले हे कपडे पोलिसांकडून प्रयोगशाळेत नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तपासाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा पुरावा ठरू शकतो असे मानले जात आहे. अशेक महादेव वाडेकर (७०, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. www.konkantoday.com