सकाळपासून किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत
* रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे विरुद्ध राऊत असा सामना होत आहे. कोकणात आज मतदान होत असताचा रत्नागिरी जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. सकाळपासून किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. सकाळपासून किरण सामंत यांचा फोन नॉटरीचेबल असल्याचे समजतेय. कार्यकर्ते किरण सामंत यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न अयशस्वी होत आहे. महाराष्ट्रात कोणत्याही नेत्याचा फोन नॉट रिचेबल झाल्यावर काहीतरी भयानक घडत असेल. पण इथे काही घडणार नाही. माझ्याकडे ग्रामीण भाग आहे. शेवटी एक कुटुंब आणि राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे. प्रत्येकांमध्ये समज-गैरसमज झाले असतील तर आम्ही कुटुंब सक्षम आहोत मार्ग काढण्यासाठी. एखादा व्यक्ती नॉट रिचेबल आहे म्हणजे माणूस वेगळेच काहीतरी करतो, ही भावना निर्माण करणे हे पण लोकशाहीमध्ये एक आक्षेप घेतल्यासारखे आहे. सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिलीwww.konkantoday.com