रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने तहसीलदार रत्नागिरी यांच्या सहकार्याने रेशन कार्ड डिजिटलiयझेशन साठी विशेष मोहीम राबवविली


रेशन कार्ड 12अंकी डिजिटलiयझेशन करण्याच्या उपक्रमामुळे असंख्य ज्येष्ठ नागरिकांना मदत झाली.
रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने दि 22मे 2025 ला तहसीलदार रत्नागिरी यांच्या सहकार्याने रेशन कार्ड डिजिटलiयझेशन साठी विशेष मोहीम राबवाली. त्यावेळी 46 कार्ड धारकांची कार्ड 12 अंकी झाली. तसेच अन्य 35 लोकांना श्रीमती निशा पाईकराव नायब तहसीलदार यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या या लोकोपयोगी उपक्रमाबद्दल रत्नागिरीतील अनेक ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देत आहेत.
ज्या नागरिकांची कार्ड्स अद्यापी 12 अंकी झालेली नाहीत त्यांनी आवश्यक त्या कागद पत्रासह रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन संघांचे अध्यक्ष श्री सुभाष थरवळ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button