
दापाेली तालुक्यातील टेटवली माेहल्ला येथे मगरीला जीवदान
दापाेली तालुक्यातील टेटवली माेहल्ला येथे राहणारे मुद्दसर माखजनकर यांच्या घरामागील विहिरीमध्ये एक मगर (मादी) आढळल्याने भीतीदायक स्थिती निर्माण झाली हाेती. एकंदरीत पावसाळ्यात नजीकच्या ओढ्यातील पाण्यासाेबत वाहून आलेले हे मगरीचे पिल्लू विहिरीत अडकले हाेते. या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण हाेते. याची माहिती मिळताच तत्काळ वन विभागाला कळवण्यात आले.
यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि सुरक्षित बचाव कार्य सुरू केले. अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची लांबी सुमारे 120 सेंटीमीटर हाेती. वन विभागाच्या पथकानें अत्यंत सावधगिरीने या पिल्लाला विहिरीतून बाहेर काढले आणि आपल्या ताब्यात घेतले. ही संपूर्ण कार्यवाही दापाेलीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रामदास खाेत, खेर्डी व ताडीलचे वनरक्षक आणि त्यांच्या सहका-यांनी पार पाडली. मगरीच्या मिल्लाला सुरक्षित ताब्यात घेतल्यानंतर त्याची पाहणी करण्यात आली. ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात साेडण्यात आले.www.konkantoday.com




