मुंबईच्या प्रसिद्ध नायर रुग्णालयाच्या कर्मचारी निवासस्थानाच्या पंधराव्या मजल्यावरून एका तरुणाची आत्महत्या
* मुंबईच्या प्रसिद्ध नायर रुग्णालयाच्या कर्मचारी निवासस्थानाच्या पंधराव्या मजल्यावरून एका तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आल आहे.पंधराव्या मजल्यावरून आत्महत्या करताच तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. रोहित किशोर गुरबानी 33 वर्ष, असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो नायर रुग्णालयात रजिस्ट्रेशन असिस्टंट म्हणून काम पाहत होता.रोहित हा 2015 पासून नायर रुग्णालयात कर्मचारी म्हणून कामाला लागला. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास रोहितने आत्महत्या केल्याचे समजते. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.www.konkantoday.com