राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये आचारसंहितेचा भंग करत मतदारांना जबरदस्तीने पैसे ? आमदार राजन साळवी यांची तक्रार

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा प्रचार काल समाप्त झाला मात्र त्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेतराजापूर विधानसभा मतदार संघामध्ये आचारसंहितेचा भंग करत मतदारांना जबरदस्तीने पैसे देऊन सही घेत असल्याचे प्रकार सुरु आमदार असल्याची तक्रार आमदार राजन साळवी यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये प्रचार अंतिम टप्प्यामध्ये सुरु असून राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये जोरदार पैशाचे वाटप करीत असल्याचे निदर्शनास येता आमदार डॉ.राजन साळवी यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना निवेदन सदर करत तक्रार दाखल केली आहे.भाजप पक्षामार्फत तुळसुंदे, कुवेशी, जैतापूर, माडबन, मिठगवाणे व संपुर्ण राजापूर तालुक्यामध्ये भाजप या पक्षाचे काही अनोळखी व्यक्ती स्थानिक व्यक्तींच्या सहाय्याने मतदारांना भुलवण्यासाठी व लोकसभेच्या निवडणूकीमध्ये भाजपला मतदान करण्यासाठी मतदारांवार जबरदस्तीने दबाव आणून पैसे वाटप करत आहेत. तसेच मतदार पैसे घेत नसला तरी त्याला जबरदस्तीने पैसे देऊन त्यांची सही घेतली जात असल्याचे निदर्शनास आले आले आहे अशा प्रकारे मतदारांवर दबाव टाकत असुन आचारसंहितेचा भंग केला जास्त आहे. तसेच पर जिल्हयातील अनोळखी वाहनांमधून पैसे येत असुन त्यांची देखील सखोल चौकशी करण्यात यावी व पैसे वाटप करणार्‍यां व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार आमदार राजन साळवी यांनी केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button