मतदान केल्यास विठाई हॉस्पिटलमध्ये मतदाराला मिळणार सवलतींचा लाभ

लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होत असून त्यामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी चिपळूणमध्ये सवलती जाहीर होत आहेत. यामध्ये विठाई हॉस्पिटलतर्फे मतदानाचा हक्क बजावा आणि ५ दिवसापर्यंत हातच्या बोटाची शाई दाखवून ओपीडी, तपासणी आणि औषधांवर सवलत मिळवा, असे आवाहन डॉ. नागेश वाघमारे यांनी केले आहे.लोकसभा निवडणुकीची धामधूम असून मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे काहींनी सवलती जाहीर केल्या आहेत.  www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button