
शिक्षक बसलेत सावलीत, विद्यार्थी मात्र राबताहेत उन्हात रत्नागिरीतील दामले विद्यालयामधील प्रकार.
सध्या रत्नागिरी शहरासह मोठ्या प्रमाणावर उकाड्यात वाढ झाली असून उन्हाच्या तीव्र झळा मारत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळेत अनेकजण घराबाहेर जाण्यास टाळतात. मात्र असे असताना देखील रत्नागिरी येथील दामले विद्यालयामध्ये भर दुपारी २ वाजता मुलांकडून भर उन्हात चर काढून माती काढण्याचे काम करून घेण्यात येत होते. मुले उन्हात काम करीत असताना शिक्षक मात्र सावलीत आराम करत असल्याचे चित्र दिसत होते.

याबाबत जागरूक नागरिकांनी याबाबत आवाज उठवला असून कोकणटुडेकडे याबाबतचे छायाचित्र पाठवले आहे. शाळेतील मुलांना श्रमदानाची सवय करणे आवश्यक असले तरी निदान उन्हाळ्याच्या दिवसात काळवेळ बघून मुलांना कामाला लावणे योग्य ठरले असते. भर उन्हात काम केल्यामुळे मुलांना काही समस्या निर्माण झाल्या तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल जागरूक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.www.konkantoday.com