
थंडपेय विक्रीतून लूटमार वाढतेय
वाढता उष्मा, रखरखत्या उन्हातून होणारा लोकसभा निवडणुकीचा प्रचार यामुळे साहजिकच थंडपेयांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. याचा गैरफायदा शहरासह गावागावातील काही दुकानदार घेताना दिसत आहेत. बाटलीमागे किंमती अतिरिक्त घेतले जात आहेत. हे पैसे पेय थंड करण्याचे असल्याचे सांगून केली जाणारी ही लूटमार ग्राहकांचा उष्मा वाढवत असून यावर अंकुश ठेवण्याचा अधिकार असलेले अन्न व औषध प्रशासन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दुर्लक्ष करताना दिसत आहे.www.konkantoday.com