
जिल्हा कॉंग्रेसमधील घडामोडींना वेग, प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आ. खलिफेंकडे देणार?
रत्नागिरी ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकर यांचा प्रचार न केल्याचा आरोप कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कदम यांचेवर कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मुंबई येथे झालेल्या वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांच्या बैठकीत याविषयी चर्चाही करण्यात आली. या सर्व प्रकारात आता कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातले असून सध्या प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून आ. हुस्नबानू खलिफे यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केल्याने पक्षश्रेष्ठी त्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहेत. यासाठी एक समिती नेमण्यात येवून ही समिती चौकशी करून अंतिम निर्णय घेईल असे वृत्त आहे.