दापोली तालुक्यातील रेवली चिरा खाणीवर ट्रकखाली आल्याने ११ महिन्याच्या मुलीचा मृत्यू
दापोली तालुक्यातील रेवली येथे चिरा खाणीवर खेळत असलेल्या ११ महिन्याच्या एका बालिकेच्या पायावरून ट्रकचा टायर गेल्याने गंभीर जखमी झाली. या बालिकेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.रेवली येथील चिरा खाणीवर २६ एप्रिल रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास प्रकाश राठोड व त्यांच्या पत्नी हे काम करत होते. त्यांनी त्यांच्या ११ महिन्यांची मुलगी नेहाला बाजूला ठेवले होते. तेवढयात खाणीवर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एमएच १२ एएल ९३२ च्या चालकाने कोणतीही खात्री न करता ट्रक सुरू केला. यावेळी चालकाच्या बाजूला खेळत असलेल्या नेहाच्या उजव्या पायाच्या मांडीवरून ट्रकचा टायर गेला व ती टायरखाली अडकली व गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी नवी मुंबई येथील एका रूग्णालयात दाखल करण्ययात आले होते. उपचार सुरू असताना तिचा २९ एप्रिल रोजी दुपारी २.१५ वाजता मृत्यू झाला. दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत. www.konkantoday.com