
शिवसेना नेते रामदास कदम-वैभव खेडेकर एकाच मंचावर
रायगड लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ तीनबत्तीनाका येथील श्री शंकर मदिरासमोरील पटांगणात गुरूवारी रात्री ८ च्या सुमारास झालेल्या प्रचार सभेदरम्यान शिवसेना नेते रामदास कदम व मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर प्रथमच एकाच मंचावर आल्याने सार्यांच्या भुवया उंचावल्या. दोघांमधील मनोमिलनाने वाद मिटल्याचे संकेतही मिळाले असल्याचे बोलले जात आहे.गेल्या काही वर्षापासून शिवसेना नेते रामदास कदम व मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यातील राजकीय संघर्षासह वैमनस्य टोकाला पोहोचले होते.www.konkantoday.com