त्यांच्याकडून खुर्ची हिरावून घेतली म्हणून खाली आग लागली-राज ठाकरे
भाजपाने अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवले असते तर त्यांच्या विरोधात ते बोलले असते काय? त्यांच्याकडून खुर्ची हिरावून घेतली म्हणून खाली आग लागली.भाजपवाले म्हणे गुजरातला उद्योग नेत आहेत. मात्र, साडेसात वर्षे उद्धव ठाकरे सत्तेत होते. तेव्हा त्यांनी भाजपला विरोध का केला नाही? कोकणात उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी उद्योग का आणले नाहीत, असा हल्लाबोल ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवली येथील प्रचारसभेत केला.’महायुती’चे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर शनिवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.यावेळी उमेदवार नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार नितेश राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार राजू पाटील, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिंदेसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होतेwww.konkantoday.com