सोमेश्वर खाडीत आढळला मृतदेह
रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर खाडीत पुरूषाचा मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देवून स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बााहेर काढला. पुलावरून उडी मारून या तरूणाने आत्मत्या केली असावी, असा कयास लावला जात आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास तरूणाचा मृतदेह सोमेश्वर पूल येथील खाडीमध्ये दिसला. या घटनेची नोंद तातडीने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृताची ओळख पटविण्याचे काम अद्याप सुरू असून पोलिसांनी मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा रूग्णालय येथे पाठवला.www.konkantoday.com