
जुन्या इमारतीचे सर्वेक्षण करण्याचे चिपळूण पालिकेचे आदेश
महिनाभरावर पावसाळा येवून ठेपला आहे. अतिवृष्टी, वादळवार्यासह कोसळणारा पाऊस आणि महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत जुन्या धोकादायक इमारतींची पडझड होण्याच्या घटना सर्रास घडतात. या दुर्घटनांमध्ये जीवितहानीसह वित्तहानी होण्याची दाट शक्यता असते. याबाबत चिपळूण नगर पालिका प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. शहरातील तीस वर्षे पूर्ण झालेल्या इमारतींचे बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र/संरचना तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करून घेवून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. www.konkantoday.com