श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचा 11 मे रोजी मासिक स्नेह मेळावा मानसोपचार तज्ञ डॉक्टर शाश्वत शेरे करणार मार्गदर्शन
* रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा मासिक स्नेह मेळावा शनिवार दिनांक 11 मे 2024 रोजी सायंकाळी चार वाजता श्रीराम मंदिरात संपन्न होणार आहे. यावेळी मानसोपचार तज्ञ डॉक्टर शाश्वत शेरे हे ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी एप्रिल व मे महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे सत्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कट्ट्याचे मुख्य संयोजक श्री. सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये आणि सचिव श्री. सुरेंद्र घुडे यांनी केले आहे