रत्नागिरी-करबुडे मार्गावरील फणसवळे कार अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा
रत्नागिरी-करबुडे मार्गावरील फणसवळे मोंडा कुरीचे भाटले येथे कार उलटून झालेल्या अपघात प्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जुबेर बद्रुद्दीन पठाण (३२, रा. बाजारपेठ, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. २८ एप्रिल रोजी घडलेल्या या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर अन्य दोघेजण जखमी झाले होते.www.konkantoday.com