
निवडणूक कालावधीतील जप्त रक्कमेच्या परतीसाठी समिती अपिलासाठी संपर्क करण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. ४ : लोकसभा निवडणूक 2024 कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील भरारी पथके, स्थिर तपासणी पथके यांनी जप्त केलेली रोख रक्कम परत करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या समितीकडे नोडल अधिकारी खर्च संनियंत्रण समिती आणि जिल्हा कोषागार अधिकारी यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या कालावधीत तपासणी पथकांकडून जप्त करण्यात आलेल्या जप्तीविरुध्द संबंधितांना या समितीकडे अपिल करता येईल. समिती अशा सर्व प्रकारणांबाबत निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सूचना नुसार सर्व पुराव्यांची तपासणी करुन ही रक्कम संबंधितांना परत देण्याची कार्यवाही करेल. याबाबत अपील करण्यासाठी नागरिकांनी नोडल अधिकारी खर्च सनियंत्रण समिती उत्तम सुर्वे यांचा मोबाईल क्र. 7588588950 यांना संपर्क करावा.www.konkantoday.com