
राजापूर पंचायत समितीचा सौरउर्जा पॅनेल प्रकल्प पाच वर्षे रखडला
शासनाच्या महाऊर्जा विभागातर्फे प्रायोगिक तत्वावर सौरउर्जा पॅनेल प्रकल्प राबविण्यासाठी राजापूर पंचायत समितीची पाच वर्षापूर्वी निवड झाली. त्याचप्रमाणे महाउर्जा विभागाच्या अधिकार्यांकडून पाहणीही झाली. मात्र पाच वर्षात राजापूर पंचायत समितीमध्ये या प्रकल्पाच्या अनुषंगाने कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे पंचायत समितीच्या इमारतीवर सौरउर्जा पॅनेल बसविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प गुंडाळला तर गेला नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे.वीजेचे भारनियमन आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे सारेच त्रस्त आहेत. त्यातच वीजबिलावरही मोठ्या प्राणात खर्च होतो. अशा स्थितीमध्ये शासनाच्या महाऊर्जा विभागातर्फे शासकीय कार्यालयांसाठी प्रायोगिक तत्वावर सौरउर्जा पॅनेल बसविण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. www.konkantoday.com