
रत्नागिरी शहराला सोमवारी पाणी पुरवठा राहणार बंद
रत्नागिरी : शहराला नगर परिषदेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. या अंतर्गत साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंंद्र तसेच शीळ धरणाच्या देखभाल दुरूस्तीसाठी रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा सोमवारी (दि. 18) रोजी बंद राहणार आहे. यापुढे दर 15 दिवसांनी अशाच देखभाल दुरूस्तीसाठी एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन केले जात आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणावर 3 पंप बसवण्यात आले आहेत. जनरेटरचीही व्यवस्था आहे. या पंपांचे सर्व्हिसिंग आणि जनरेटरची तपासणी दर आठवड्याला करण्याची गरज असते. त्यामुळे हे काम 15 दिवसांतून एकदा केले जाणार आहे. साळवीस्टॉप येथे जलशुद्धीकरण केंंद्र असून येथील यंत्रणांचीही तपासणीं करावी लागते. ही तपासणी झाली नाही तर अचानक बिघाड निर्माण झाल्यास शहराला गढूळ पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.