
शेतकर्यांना आता थेट वस्तू, औजारे देण्याचा नवा पॅटर्न येणार
थेट लाभ हस्तांतर (डीबीटी-डायरेक्ट बेनिफिट ऍण्ड ट्रान्सफर) योजनेचे निकष बदलण्यात येणार आहे. योजनेत शेतकर्यांना साहित्य अथवा वस्तू घेतल्यानंतर बिले अदा करण्याची तरतूद होती. मात्र यामध्ये वस्तू न घेताच बिल पदरात पाडून घेण्याची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर आाता योजनेत थेट वस्तूच शेतकर्यांना देण्याचा पॅटर्न राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये कृषी सहाय्यक ते थेट ग्रामसेवकांची साखळी असल्याने योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. www.konkantoday.com