
राजापूर अर्बन बँकेच्या कर्जवाटप घोटाळ्याची चौकशी करा, सर्वसाधारण सभेत सभासदांची मागणी
राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेतील कर्ज वाटप घोटाळा मुद्यावरून रविवारी झालेल्या वार्षिक सभेत मोठा गारोळ झाल्याचे पहायला मिळाले. बीटाळ्यासंदर्भात पोलीस चौकशीचा फार्स न करता सीबीआय चौकशी करत दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी राजापूर अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी केली.
बँकेची १०४ वी सर्वसाधारण सभा चेअरमन संजय ओगले यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकर भवन सभागृहात पार पडली. ही सभा बँकेच्या कथित घोटाळ्यावरून चांगलीच वाजली. सीईओ शेखरकुमार अहिरे यांनी बँकेच्या रत्नागिरी शाखेत घोटाळा झाला असल्याची माहीती देताना यासंदर्भात सहाय्यक निबंधकांकडून चौकशी सुरू असून पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. रत्नागिरी शाखाधिकारी यांना निलंबित केल्याची माहिती दिली. यावेळी सभासदामधून संचालक मंडळ व सीईओंना धारेवर धरत कर्ज वाटपाची माहिती आपणाला नव्हती का? असा प्रश्न उपस्थित करीत सीईओसह सर्व संचालक मंडळाला जाब विचारला.
कर्जे कोणाच्या अख्यत्यारीत दिली? कर्ज प्रकरणे केली नसतानाही सुमारे रानापूर अर्थस को- ऑपरेटिव्ह बँक तिजापूर वार्षिक सर्वसाधारण सभा ४० सभासदांना सहाय्यक निबंधकांकडून कर्ज वसुलीच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. शाखाधिकार्यांना कर्ज मंजुरीसाठी ५ लाखांची मर्यादा असताना रत्नागिरी शाखेत २० लाखांच्यावर दिलेली कर्जे ही कोणाच्या अख्यत्यारीत देण्यात आली. याला संचालक मंडळ जबाबदार नाही का? बँकेकडे आम्ही कोणतीही कागदपत्रे दिलेली नसतानाही बैंकने आमच्या नावे कज दिले व जामीन कसे ठेवले असे प्रश्न उपस्थित करीत काही संचालक मंडळाच्या नातेवाईकांनी घेतलेली कर्ज एनपीएमध्ये गेलेली असताना त्यांना पुन्हा पुन्हा कर्ज दिले जाते, मात्र घेतलेले कर्ज वेळेत फेडले असताना पुन्हा कैर्जाची मागणी केली असता कर्त देण्यास टाळाटाळ केली जाते.. यावरून बँकेतील अनागोंदी कारभार स्पष्ट होत असल्याचे सांगितले. काही सभासदांना या घोटाळ्याची व्याप्ती पाहता बँकेनौल सोनेतारण कर्जाची पडताळणी करावी अशी मागणी केली.www.konkantoday.com




