गृह मतदानाच्या सोयीबद्दल पद्मा आठल्ये यांनी दिले धन्यवाद निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांची गृह मतदानावेळी भेट
रत्नागिरी, दि. 2 (जिमाका) : इच्छा असून देखील वयामुळे, शारीरिक व्याधीमुळे मतदान केंद्रांपर्यंत जाता येत नाही. माझ्यासारखे असे अनेकजण आहेत. अशा 85 वर्षांपुढील मतदारांसाठी गृह मतदानाची भारत निवडणूक आयोगाने सोय केल्याबद्दल आरोग्य मंदिर येथील पद्मा आठल्ये (वय 87) यांनी धन्यवाद दिले. निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी या गृह मतदानावेळी भेट देऊन नियोजन विशेषत: गोपनीयतेबाबत पाहणी केली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई उपस्थित होते. मतदानानंतर श्रीमती आठल्ये म्हणाल्या, मला 87 वर्षे पूर्ण झाली असून, 88 वे वर्ष चालू झाले आहे. होता. बाहेर जाऊ शकत नाही म्हणून गृह मतदानासाठी मी अर्ज केला होता. माझ्यासारखे अनेक लोक आहेत की, जे मतदानासाठी बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगाने गृह मतदानाची सोय केली आहे. त्याबद्दल धन्यवाद.