जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा 8 व 9 जानेवारी रोजी डेरवणमध्ये

रत्नागिरी, दि. 6 : जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) विभागाच्या जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा दि. 8 व 9 जानेवारी रोजी अशा सलग दोन दिवस विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट स्पोर्टस अॕकॅडमी, डेरवण ता. चिपळूण येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन 8 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.एम. कासार यांनी कळविले आहे.

8 जानेवारी रोजी पहिल्या दिवशी मोठा गट मुलगे/मुली यांच्या सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत. दुस-या दिवशी दिनांक 9 जानेवारी रोजी लहान गट मुले/मुली यांच्या सांघिक व वैयक्तिक स्पर्धा होतील. तरी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व स्पर्धकांनी व मार्गदर्शक शिक्षकांनी दोन्ही दिवशी वेळीच उपस्थित रहावे. क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर येताना दरवर्षा प्रमाणे एस.टी.च्या सवलतीच्या दराने तिकीटानुसार खर्च प्रदान करण्यात येणार आहे. 000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button