समुद्रात वाहणार्‍या जोरदार वार्‍यामुळे मासळीची आवक घटल्याने दर तेजीत

सध्या समुद्रात वाहणार्‍या जोरदार वार्‍यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी बोट जात नसल्याने मासळीचा दुष्काळ जाणवत आहे. मासळीची आवक घटल्याने दर मात्र तेजीत असल्याने खवय्यांचा हिरमोड झाला आहे. सध्या सुट्ट्या, लग्नसराई, विविध उत्सव, यात्रांसाठी मोठ्या संख्येने चाकरमानी व पर्यटक गावाकडे आले आहेत. या मासे खवय्यांना मनासारखे मासे खाता येत नाहीत. कारण समुद्रात होणार्‍या वादळामुळे मच्छिमार बोटी घेवून मच्छिमारीसाठी समुद्रात जात नसल्यामुळे माशांची आवक घटली असल्याने दरही गगनाला भिडलेले आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button