सर्वांगीण विकासासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सज्ज व्हा : ना. नारायण राणे

रत्नागिरी । प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला महासत्ता होण्याच्या दिशेने नेत असताना महिला, युवक, शेतकरी आणि गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी कार्यरत आहेत. यावर बोलण्याचे कुठलेच मुद्दे विरोधकांकडे नसल्याने ते जातीभेद निर्माण करत आहेत. मात्र पंतप्रधान मोदिनी नेहमीच माणुसकीचा धर्म जपत काम केला असून असे नेतृत्व पुन्हा या देशाला मिळवून देतानाच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कमळ या निशाणीवर मतदान करा असे आवाहन भाजपा महायुतीचे रत्नगिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार ना. नारायण राणे यांनी केले. महायुतीचे उमेदवार ना. राणे ह्यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील वाटद आणि कोतवडे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री ना. रवींद्र चव्हाण ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, कांचनताई नागवेकर, विवेक सुर्वे, प्रकाश साळवी, गजानन पाटील, विवेक सुर्वें, नगरसेवक उमेश कुळकर्णी ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतिश शेवडे , सदस्य बाबू शेठ पाटील, योगेंद्र कल्याणकर, तारक मयेकर, अनिकेत सुर्वे, अझीम चिकटे, बापू सुर्वे, भाई जाधव ह्यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना ना. राणे म्हणाले, कुठलेही मुद्दे नसल्याने विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. संविधान बदलणार असा अपप्रचार सुरु आहे. पण पंतप्रधानांनी कधीच जातीभेद धर्मभेद केला नाही, त्यांच्यासाठी माणुसकी हा धर्म आहे तर महिला, युवक, शेतकरी आणि गरीब या जाती आहेत. या जातीतील लोकांचे जीवनमान वाढावे यासाठी ते काम करत आहेत. कोरोना काळातील त्यांच्या कामामुळे आपण या महामारीचा सामना करू शकलो, मोफत अन्न, मोफत घर, घराघरात पाणी, औषधपाण्यासाठी आयुष्यमान भारत योजना, उज्ज्वला गस योजना, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केले. भारत देश स्वातंत्र्याचे १०० वर्ष पूर्ण करणार असतानाच तो विकसित, आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी पंतप्रधानाचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र मोदींच्या या कुठल्याच कामापर्यंत पोहोचण्याची क्षमता विरोधकांची नसल्पायाने आणि विरोधाचे मुद्वदे नसल्याने जस पावसाळ्तयात बेडूक उगाच ओरडतात तसे विरोधक निवडणुका आल्यावर विरोध करत आहेत असे ना. राणे म्हणाले. यावेळी त्यांनी उबठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आणि कार्यपद्धतीवर टीका केली. ना. रणे म्हणाले या राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून मी अनेक पदांवर काम केले आहे त्यावेळी मी जात धर्म पहिला नाही, मदत मागायला जे कोणी समोर येते त्या प्रत्येकाला मदत कारणे हे माझे कर्तव्य समजतो. सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्न केले, तिथले जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला, मात्री विरोधकांनी रोजगार देणारे प्रकल्प घालवून तुमचे नुकसान केले आहे. मात्र आता या भागाचा विकास करत विकसित भारतामध्ये कोकणचे नाव अग्रणी करण्यासठी मी कटिबद्ध आहे, मला तुमची सेवा करायची आहे यासाठीच येत्या ७ मे रोजी मतदानाला बाहेर पडा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्वांनी जोमाने कामाला सुरुवात करा, प्रत्यके वाडी वस्ती मध्ये जा आणि महायुतीच्या वतीने ही निवडणूक देशासाठी आपले भविष्य घडवण्यासाठी आहे हे पटवून द्या, कमळाला आणि राणे साहेबाना मत देण्यासाठी काम केले पाहिजे, या मतदार संघात विक्रमी मतदान होण्यासठी काम करा असे आवाहन केले. तर पालकमंत्री उदय सामंत म्हणाले जयगड हा मच्छिमारांचा परिसर आहे त्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले आहेत, कोतवडे, खंडाळा जिल्हा परिषद गटात महायुतीची चांगली ताकद आहे त्यामुळे इथे विक्रमी मतदान झाले पाहिजे, इथे घराघरात जाऊन प्रचार सुरु आहे. महिला पदाधिकार्यांनी प्रामाणिक काम सुरु केले आहे, इथे महिलांची तकाद मोठी आहे, त्यांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत हा महिला वर्ग आमच्याकडे आहे. आता प्रत्येकाने मोदींना पंतप्रधान करायचे आहे हे भान ठेऊन काम करा असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button