
राज्यात काल शनिवारी दिवसभरात ३४२७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ
राज्यात काल शनिवारी दिवसभरात ३४२७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर एका दिवसांत ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शनिवारी १५५० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
आतापर्यंत राज्यात ४९ हजार ३४६ जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या ५१ हजार ३७९जणांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ४ हजार ५६८ इतका झाला आहे.
आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे ३८३० जणांचा मृत्यू झाला आहे.
www.konkantoday.com