
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे अपघात रोखण्यासाठी आता रंबल पट्ट्यांची शक्कल
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलावरील वक्राकार वळणासह उड्डाणपूल व नवा जुगबुडी पूल अपघातांसाठी हॉटस्पॉट ठरत आहे. नव्या जगबुडी पुलावर विशेषतः अवजड वाहनांच्या अपघातामुळे वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. या पार्श्वभूमीवर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवून अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने रंबल पट्ट्यांची नवी शक्कल चढवली आहे. मात्र ही तकलादू उपाययोजना कितपत प्रभावी ठरेल, हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.मुंबई-गोवा महामार्गावर खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या चौपदरीकरणाती परशुराम घाटातील काही भाग वगळता अन्य भागातील चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. मात्र चौपदरीकरणातील भोस्ते घाटासह भरणे येथील नवा जगबुडी पुल आतापासूनच अपघातांच्या दृष्टीने शापित बनत चालला आहे. भोस्ते घाटातील अवघड वळणावर अवजड वाहनांना घडणारे अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याचे सारे प्रयास फोल ठरल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. www.konkantoday.com