खेड शहरामध्ये अनंत गीते यांची खेडमध्ये प्रचार रॅली
रायगड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सोमवारी खेड शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली. पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.गीते यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी अनंत गीते यांच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. संजयराव कदम, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब, विजय जाधव, दर्शन महाजन, तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी शहयात प्रत्येक दुकानात व घरोघरी जावून अनंत गीते यांचे वचननामे दिले व त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन मतदारांना केले. www.konkantoday.com