रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण व शहरी भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले
रत्नागिरी जिल्हा ग्रामीण व शहरी भाग मिळून एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ अखेर २,३४,८१५ एवढे संशयित रक्तनमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी वर्षभरात ७ रूग्ण मलेरिया पॉझिटीव्ह आढळून आले. म्हणजे एकूणच हिवताप रूग्ण दर कमी होत आहे. तर दुसरीकडे डेंग्युसारखे आजार डोके वर काढत आहेत. वर्षभरात डेंग्यू तपासणीसाठी ४७५ रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली.www.konkantoday.com