श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा ४ मे ऐवजी १८ मे रोजी संपन्न होणार.
* रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा माहे मे मधील भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा दिनांक ४ मे ऐवजी शनिवार दिनांक १८ मे २०२४ रोजी दुपारी ३ ते ५ वाजता या वेळेत श्रीराम मंदिरात संपन्न होणार आहे. काही अपरिहार्य कारणास्तव मेळाव्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. भजनी कलावंतांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. १८ मे रोजीच्या भजनी कलावंत मार्गदर्शन मेळाव्यात भजनी कलेचे अभ्यासक पत्रकार श्री. प्रकाश वराडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी स्वरचित भक्ती गीते हा विषय ठेवण्यात आला असून भजनी कलावंतांनी आपली स्वरचित भक्ती गीते अथवा स्वरचित गजर, स्वरचित गवळण गीते यावेळी सादर करावीत. प्रत्येकाला एक स्वरचित भक्ती गीत किंवा स्वरचित गजर किंवा स्वरचीत गवळण सादर करता येईल. या मेळाव्याला भजनी कलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे मुख्य संयोजक श्री. सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये आणि सचिव श्री. सुरेंद्र घुडे यांनी केले आहे.www.konkantoday.com