दिवाण खवटी स्थानकानजिक मंगळूर एक्सप्रेसमधून महिलेचे दीड लाखाचे दागिने लंपास

कोकण मार्गावरून धावणार्‍या मंगळूर एक्सप्रेसमधून एका प्रवासी महिलेचे एक लाख ५६ हजार ४८० रुपये किंमतीची सोन्याची दोन मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने हिसकावून पोबारा केल्याची घटना दिवाणखवटी स्थानकानजिक शनिवारी घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर खेड येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणार्‍या महिला प्रवाशाचे मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.स्नेहल लहू रेवाळे या २७ एप्रिल रोजी मंगळूर एक्सप्रेसच्या बोगी नं. एस-६ मधील आसन क्रमांक २० व २२ वरून झोपून प्रवास करत होत्या. ही एक्सप्रेस दिवाणखवटी स्थानकात थांबल्यानंतर मार्गस्थ होत असतानाच अज्ञात चोरट्याने खिडकीतून हात घालून त्यांच्या गळ्यातील १ लाख ५६ हजार ४८० रुपये किंमतीचे दोन मंगळसूत्र हिसकावत पोबारा केला. मंगळसूत्र चोरीला गेल्याने धक्का बसलेल्या महिलेने थेट पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदविली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button