
दापोली शहराला चार दिवस आड पाणीपुरवठा.
वाढत्या उष्णतेमुळे पाण्याच्या पातळीत घट झाली असल्यामुळे ठिकठिकाणी पाण्याची कमतरता भासत आहे.दापोली तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींकडून पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली आहे. त्यापैकी चार गावांमध्ये पाण्याचा टँकर धावत आहे तर दापोली शहराला चार दिवस आड पाणीपुरवठा चालू झाला आहे.दापोली तालुक्यातील केळशी, उंबरशेत, बुरोंडी, ओणी भाटी व मुरूड अशा पाच गावांनी पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे. उंबरशेत, बुरोंडी, ओणीभाटी या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून मुरूड येथे देखील लवकरच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. टँकरग्रस्त गावांची संख्या वाढत असली तरी पाण्याची वाहतूक करणारा एकच टँकर आहे. त्यामुळे या एकाच टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना प्रशासनाची कसरत होत आहे. www.konkantoday.com