लग्नासाठी आलेल्या इसमाचा झोपेत मृत्यू
खेड येथे लग्नासाठी आलेल्या किशोर आत्माराम मोहिते (५०, रा. जुहु कोळीवाडा, मुंबई) याचा झोपेत ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचा प्रकार घडला आहे. किशोर मोहिते हे लग्नासाठी गावी आले होते. यातील फिर्यादी हे लग्नाची तयारी करण्यासाठी किशोर मोहिते यांना उठविण्यास गेले असता त्यांची कोणतीही हालचाल दिसुन आली नाही. त्यांना तातडीने खेड येथील कळंबणी रूग्णालयात नेण्यात आले परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.www.konkantoday.com