
मुंबई आणि ठाण्यासह कोकणात आजपासून उष्णतेच्या लाटेचा अंदाज
मुंबई आणि ठाण्यासह कोकणात आजपासून उष्णतेच्या लाटेचा अंदाज पुन्हा वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील काही भागांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळं आजपासून पुढच्या तीन दिवसांत मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांनाही कडक उन्हाच्या झळांना सामोरं जावं लागण्याचा अंदाज आहे. त्यामुळं नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.उत्तर कोकणात 28 आणि 29 एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं तापमानाचा पारा 40 ते 42 अंशावर जाण्याचा अंदाज आहे. याआधी 15 आणि 16 एप्रिल या दोन दिवसांत मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये अनेक ठिकाणी तापमानामध्ये वाढ जाणवली. त्यावेळी नवी मुंबईत पारा 41 अंश, पनवेलमध्ये 43 अंश सेल्सियसवर गेला होता.www.konkantoday.com