भाजप निवडणूक हरणार असल्याने मुस्लिमविरोधी प्रचार, हुसेन दलवाई यांचा आरोप

भाजप ही निवडणूक हरणार याची आता खात्री झाल्यानंतर प्रधानमंत्री आणि त्यांचे लोक काहीही बरळायला लागले आहेत. दोन दिवसाअगोदर त्यांनी सांगितले की, कॉंग्रेस पक्ष तुमच्या खिशातून पैसे काढून मुसलमानांना वाटणार आहे. तुमचे दाग-दागिने त्यांच्यासाठी वाटले जाणार आहेत. जे लोक घुसखोरी करीत आहेत, त्यांच्यासाठी हे सगळं केले जाते. घुसखोरीविरोधात कॉंग्रेसने जितकी जाहीर भूमिका घेतली आणि जितक्या लोकांना शिक्षा केल्या, तसं भाजपच्या काळात काहीच झालेलं नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button