
कोकण रेल्वे मार्गावर वातानुकुलीत एलटीटी-थिविम स्पेशल
कोकण मार्गावरून धावणार्या नियमित रेल्वेगाड्यांसह उन्हाळी स्पेशल गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने गुरूवारी वातानुकुलीत लोकमान्य टिळक टर्मिनस-थिविम उन्हाळी स्पेशल जाहीर केली आहे. २६ एप्रिलपासून स्पेशलच्या ३२ फेर्या धावणार असून गुरूवारपासून आरक्षण खुले झाल्याने पर्यटक सुखावले आहेत.उन्हाळी सुट्टी हंगामामुळे रेल्वेगाड्यांना उसळणार्या गर्दीमुळे प्रवाशांची चढाओढ सुरू आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या पडल्याने चाकरमानी गावी डेरेदाखल होत आहे. यामुळे रेल्वेगाड्या भरून धावत आहेत. तुफानी गर्दीमुळे चाकरमानी लोंबकळत प्रवास करत गाव गाठत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून उन्हाळी स्पेशल चालविण्यात येत असल्या तरी सर्वच स्पेशल गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने चाकरमान्यांना लटकंतीचा प्रवास करावा लागत आहे. www.konkantoday.com